Lockdown .. आणि लहाण मुले
त्यामध्ये पहिली बाब म्हणजे त्यांच्या शाळेला लवकर सुट्ट्या मिळाल्या व परीक्षेचं टेन्शन गेलं.
त्यांना हवं तेवढं मनभरून झोपायला मिळालं.जे सकाळी लवकर शाळा असणाऱ्या मुलांना मिळत नव्हतं.
काही मुलांना चित्र काढण्याची खूप आवड असते त्यांनी खूप सारे चित्र काढले. काहींनी घरातल्या घरात बनवलेले केक सारखे आवडणारे पदार्थ खाल्ले.
आवडणाऱ्या टीव्ही वरील सीरियल जसे तारक मेहता , अल्लादिन, शक्तिमान किंवा इतर कार्टून चॅनल त्यांना हवं तेवढं वेळ पाहता आले.मुख्य म्हणजे त्यांच्या डोक्यावरील शाळेचे असलेले गृहपाठाचे टेन्शन नाहीसे झाले .
हे झाले चांगले अनुभव.
आता काही वाईट अनुभव.
सर्वात जास्त त्यांचे आवडणारे शाळेतील मित्र, मैत्रिणी यांना भेटण, बोलणं, भांडण अस काहीच करता आलं नाही.
मुख्य म्हणजे शाळेला खूप सुट्ट्या असतानाही त्यांना मामाच्या गावाला जाता आल नाही.आंबे खाल्ले नाही. बाहेर जाऊन खेळणे नाही .
सगळे भाऊबहिन घरातच असल्याने एकमेकांसोबत मोबाईलवरून, टीव्ही वरून, खूप भांडण झाले , त्याचा त्रास मग आईवडीलांना झाला
अशा काही चांगल्या वाईट गोष्टी लहान मुलांच्या बाबतील घडल्या.
तुमच्या भावना comment करा आणि *आवडल्यास* तुमच्या मित्रांना share करा.
*धन्यवाद!!!👍*

Truth
उत्तर द्याहटवालहान मुलांच्या जीवनात चालू असलेल्या गोष्टीचं वर्णन भावा
उत्तर द्याहटवामुलांना महाभारत आणि रामायण जाणुन घेण्याची ओढ लागली....
उत्तर द्याहटवा