पोस्ट्स

Study smart, not hard — 12th Board साठी Quick Guide तयार! 📘✨

इमेज
 १२वीचा वर्ष महत्त्वाचं असतं, त्यामुळे exam साठी smart तयारी गरजेची आहे. खाली काही सोप्या पण उपयोगी टिप्स दिल्या आहेत: 1) अभ्यासाचा छोटा प्लॅन बनवा दररोज कोणते chapters करायचे ते ठरवा. Random अभ्यास करू नका. 2) रोज ठराविक वेळ द्या 2–3 तास दररोज अभ्यास केला तरी चालेल, फक्त सातत्य ठेवा. 3) Concept समजून घ्या फक्त पाठांतर नको. Chapter चं logic समजलं की प्रश्न बदलला तरी सोडवता येतो. 4) Short notes बनवा Exam आधी revision पटकन होते. Formula sheets व flowcharts खूप use होतात. 5) Previous papers सोडवा Exam pattern समजतो आणि time-management improve होतो. 6) Weak parts वर जास्त लक्ष द्या जितके कमी येतात, ते chapters आधी strong करा. 7) Mobile दूर ठेवा Study करताना DND किंवा silent वापरा. Distraction कमी झाला की focus वाढतो. 8) Revision करा आठवड्याला एकदा आणि exam आधी सलग revision केलं तर गुण पक्के वाढतात. 9) Health सांभाळा झोप, पाणी आणि हलका exercise — concentration वाढवतो.

आपले पर्यावरण आपली जबाबदारी..

इमेज
 पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या सभोवतालचा परीसर. आपल्या जिवनात पर्यावरणाला खूप महत्व आहे. पर्यावरण आहे त्यामूळे आपण आहोत. मानवाची उत्पत्ती पर्यावरणामुळेच झाली.  पर्यावरणात उपलब्ध असलेले सर्व घटक जसे हवा, पाणी, जमीन ,झाडे या सर्वांची हानी सध्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहे . मानवाचा जसजसा प्रगती झाली तसतशी पर्यावरणाची नुकसान होत गेले आणि अजूनही होत आहे. जसे की रस्त्यांसाठी डोंगर पोखरने, घरांसाठी झाडे तोडणे, दूषित पाणी नदीत सोडणे , मोबाईल टॉवर मुळे पक्ष्यांची संख्या कमी होणे असे बरेच काही सध्या होत आहे आणि यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे यावर लवकर पाउले उचलून प्रयावरणाच्या रक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण वैयक्तीक पणे काय करू शकतो याचा उहापोह मी याठिकाणी करतो.  पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करणे. यांमध्ये प्लास्टिक वापर कमी करणे.यासाठी आपण कपड्याच्या पिशव्या वापरू शकतो. पिण्याची पाण्याची बाटली सोबत ठेवणे जेणेकरून प्रत्येकवेळी पिण्यासाठी प्लास्टिक ची पाण्याची बाटली विकत घ्यावी लागणार नाही. प्रदूषण कमी करण्यासाठी शक्य तेथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे. य...

आवाजबंदी की अजानबंदी ?

इमेज
राज ठाकरे यांची सभा झाल्यापासून भोंगे हा विषय खूप चर्चेचा झालाय आणि तशी चर्चा होण्यासाठीच हा मुद्दा पुढे आणण्यात आलाय .पण तस बघायला गेल्यास भोंगे हा विषय आपल्यासाठी नवीन नाही . कारण वेळोवेळी सर्वोच्च नायालयाने दिलेल्या निकालानुसार सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा किती असावी यावर आपले मत मांडले आहे. भोंगे हे फक्त मशिदींवर नसून सर्व धार्मिक स्थळांवर आहे. सर्वच जण त्याचा विनापरवानगी वापर करतात. कायदा हा सर्वांसाठी सारखा असावा अस आपल्याला वाटत आणि ते योग्यही आहे. पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा आपल्या भावना दुखायला लागतात. मग अशा वेळी आपण कायद्याला किंवा आपल्यामुळे इतर लोकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या भोंग्याचा आवाज हा विशिष्ट धर्माच्याच लोकांना एकु जात नसून लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना तो ऐकू जात असतो. जेव्हा एखादा लहान मूल झोपलेले असते आणि अचानक भुकंपासारखा त्याला आवाज येऊन ते झोपेतून जाग होते तेव्हा त्याला शांत करायची कसरत त्याच्या आईलाच करावी लागते. बिचारा नुकताच झोपलेला असतो. तसच वृद्धांना सुद्धा शांततेत काम करण्याची सवय असते अशा दररोज अनावश्यक होणा...

आयुष्यावर बोलू काही..

इमेज
सुबह होती हैं। शाम होती हैं।  जिंदगी यूं ही ,तमाम होती हैं। या हिंदीतील ओळी आपल्याला बरच काही सांगून जातात. प्रत्येकाचा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.  माझ्या मते आपल्या जीवनाला एक धेय्य असावं की आपल्याला आपल्या जिवनात काय करायचं , आपन कशासाठी जगायचय याचं कारण आपल्या प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो नाहीतर वरच्या ओळीप्रेमाने आपलं आयुष्य होईल. आपल्याला आपला जिवन जगायच म्हणुन जगतो असं वाटायला नको. कारण ध्येय असल्यावर ते पूर्ण करण्यासाठी माणूस प्रत्येकवेळी काहीना काही नवीन शिकत राहतो, ध्येय प्राप्त करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या मिळवण्याचं काम करतो. या सर्व झटपटित जीवन एक आकार घ्यायला लागेल. त्यामुळे प्रत्येकाचा आयुष्यात ध्येय असणे गरजेचे आहे. जसे समजा आपल्याला एखाद्या गावी जायचं आहे.तर त्या गावी जाण्यासाठी काय काय करणे गरजेचे आहे ते आपण करतो. जसे सामानाची निवड करणे, रस्त्याची माहिती करणे, बसची महिती करून घेणे आणि त्या गावी आपल्याला काय कामासाठी जायचं आहे. याची जशी आपण तयारी करतो तशीच तयारी आपल्याला आपल्या जीवनात ...

आपले आरोग्य, आपल्या हाती

इमेज
माणसाचे आरोग्य हे दोन प्रकारचे आहे. पहिले शारीरिक आणि दुसरे मानसीक . शारीरिक आरोग्यविषयक बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे आणि त्याची काळजी प्रत्येक जण घेत असतो. परंतु मानसीक आरोग्याविषयी अजूनही तेवढी चर्चा आपल्यामध्ये होताना दिसत नाही. यामुळे आपल्याला मानसीक आरोग्यावर जास्त लक्ष्य देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीनाकाही समस्या आल्या आहेत. याचमुळे काही प्रमाणात मानसीक आरोग्यावर सुद्धा परिणाम झालेला दिसतो मागील काही दिवसात आलेल्या बातमी नुसार यावर्षी झालेल्या वक्तींच्या आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामागे काही महत्वाची कारणे म्हणजे नोकरीची अस्थिरता, अर्थिक ताणतणाव, परिवारातील समस्या ई. होती. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी असा अडचणीचा टप्पा येतो की आपल्याला मरणे हे जगण्यापेक्षा सोपे वाटते. मग अशा वेळी व्यक्ती आत्महत्येचा विचार करतो. पण आत्महत्या हा काही या गोष्टीवर उपाय नसतो. म्हणुन आपले मानसीक आरोग्य निरोगी राण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयीचा विचार आपण याठिकाणी करू. १. संवाद : संवाद हा आपल्या जिवनात खूप महत्वाचा आहे. आपल...

कोरोना ,शिक्षण, विद्यार्थी...उद्याच भविष्य?

इमेज
 कोरोना आल्यापासून सर्वात जास्त नुकसान कोणाचं होत असेल तर ते म्हणजे शिक्षणाचं. आर्थिक नुकसान तरी भरून काढता येईल पण शैक्षणिक नुकसान भरून निघणे जास्त अवघड आहे. नुकत्याच कशातरी शाळा सुरू झाल्या होत्या पण पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती म्हणून पुन्हा सरसकट सर्व शाळा बंद करण्यात आल्या. आपल्या सर्वांनाच याचा अनुभव आला आहे की शाळेतील शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यात किती फरक आहे. शेवटी शाळेतल्या शिक्षणाची गुणवत्ता ऑनलाईन शिक्षनाला येणे नाहीच . त्यामुळे माझ्या मते सरकारने शाळा बंद करण्याआधी योग्य विचार करणे पालकांचं तसेच विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं मत विचारात घ्यायला पाहिजे. असे केल्यानंतर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती बघून निर्णय घ्यायला पाहिजे. सरसकट सर्वच शाळा बंद करणं हे काही प्रमाणात मला तरी चुकीचं वाटत. कारण बऱ्याच गावाकडच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोरोनाचे नियम पाळून शाळा होऊ शकतात.  ज्या प्रमाणे सरकार निवडणुकांसाठी नियमावली तयार करते पण निवडणूक घेतेच. त्याचप्रमाणे शाळा, कॉलेजचं सुद्धा नियम बनवावे आणि शाळा ,कॉलेज सुरू ठेवावे असे मला वाटते. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाची ग...

मैत्री..

इमेज
 मित्र, सखा, सवंगडी,दोस्त , सोबती असे कितीतरी नावाने ज्याला आपण संबोधतो ती म्हणजे मैत्री.आपण आपल्या आईवडीलांपेक्षाहीजास्त वेळ आपल्या मित्रांसोबत घालवत असतो.आपले जीवनाच्या जडण घडणीत सर्वात जास्त वाटा आपल्या मित्रांचा राहत असेल, असे मला वाटत.. कोण असतो मित्र ? मित्र असा व्यक्ती की ज्या गोष्टी आपल्याबद्दल आपल्या घरच्यांनाही माहिती नसतात त्या आपल्या मित्रांना माहिती असतात. आपल्याला हवं ते बोलण्याचा स्वतंत्र आपल्या मित्राजवळ असत.प्रत्येक क्षणी नेहमी आपल्या अडीअडचणी,सुखात, दुःखात आपल्या सोबत राहतो तो आपला मित्र. मित्राची अशी कुठलीही ठराविक व्याख्या मला तरी करता येणार नाही.कारण या मैत्रीचे अनुभव सगळ्यांना वेगवेगळे असणार.  आपल्या आईवडीलांपासून शिक्षणाच्या ,नोकरीच्या निमित्ताने दूर असताना सर्वात जास्त आपली काळजी घेणारा आपला मित्रच असतो. मित्रच आपल्याला कित्येक चांगल्या गोष्टी शिकवतो . मनमुराद पणे त्याच्यासोबत आपण वागू शकतो  मला माझ्या मित्रांनी खूप मदत केलीय. जेव्हा मी खचून जायचे, निराश व्हायचो तेव्हा माझे मित्रच मला खंबीरपणे साथ द्यायचे .मी दहावी झाल्यानंतर शिक्षणासाठी आईवडिलांपा...

प्रेमाला वय नसतं..

इमेज
 प्रेम..असा शब्द की ज्यावर कितीही लीहीली तरी कमीच. प्रेमाला ना सीमा असतात ,ना कुठलं बंधन असत, ना कुठल्या मर्यादा. प्रेम हे सतत वाहणऱ्या झऱ्याप्रमाणे असते स्वच्छ ,निर्मळ आणि निरंतर . प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी ठरवून केली जात नाही जे आपसूक होऊन जाते.

विद्यार्थी, परीक्षा आणि सुप्रीम कोर्ट

इमेज
मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व विद्यापीठांना परीक्षा घेणे बंधनकारक झाले.  भलेही तुम्ही परीक्षा पुढे ढकला, पण परीक्षा ही  घ्यावीच लागणार. माझ्या मते तरी  हा निर्णय विद्यार्थी  हिताचाच आहे आणि मी याचं स्वागत करतो. कारण कोरोना हे कारण पुढे करून अभ्यासू होतकरू विद्यार्थ्यांना व अभ्यास न करता परीक्षेला टाईमपास मानणाऱ्या मुलांना , एकाच रांगेत बसून सर्वांना पास करणं हे  नक्कीच  चुकीचं आहे. सर्व प्रकारच्या उपायोजना करून विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हेच संयुक्तिक ठरेल. पुढील निर्णय येण्याची वाट बघू तोपर्यंत तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपली हरवलेली पुस्तके, नोट्स गोळा करायला लागा आणि अभ्यास सुरु करा.  सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया धन्यवाद. तुमचेही काही मत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि आपल्या विचारांना वाट मोकळी करून द्या.

LOCKDOWN आणि MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा

महाराष्ट्रात दि. 15 मार्च पासून Lockdown सुरु झाले. त्यावेळी शासनाने परीक्षे बाबत कोणताही ठोस निर्णय न घेता परीक्षा आहेत त्याच वेळेनुसार घेण्यात येतील असे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातून पुणे, दिल्ली इ. ठिकाणी आलेली विद्यार्थि आहे त्याच ठिकाणी थांबले. परंतु काही दिवसांनी सर्व परीक्षा काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना खूप अडचणी, समस्या तयार झाल्या. मग कशीतरी व्यवस्था करून , हे सर्व जण आपल्या घरी परत आले. परंतु गावात आल्यावर त्यांच्या अडचणी काही दुर झाल्या नाही. इथे पुस्तकं मिळणं, अभ्यासिकेच वातावरण मिळणं थोड अवघड आहे. त्यामुळे या गावाकडे आलेल्या विद्यार्थी मित्रांना मदत व्हावी यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती

इमेज
Unlock केल्यापासून संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात कोरोना पेशंट वाढत आहेत.   दिवस रात्र एक करून आपली सेवा करणाऱ्या या पोलिसांमध्ये सुद्द्धा  corona positive पेशंट आढळत आहेत. आज यांच्यावर आलेली वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते. त्यामुळे सर्व पोलिसांची कोरोणा चाचणी होत आहे का ? पोलीसांना कोरोणा झाल्यास हॉस्पिटल कुठे आहे ? पोलिसांच्या घरातील व्यक्तींना corona झाल्यास काय व्यवस्था आहे ? सर्व पोलिसांसाठी मास्क, पिपीई किट, sanitizer उपलब्ध आहे का ? असे मुद्दे उपस्थित होतात. आजपर्यंत पोलिसांनी आपली काळजी घेतली.  आता आपले कर्तव्य आहे,   त्यांची काळजी घेण्याची.    पोलीसांना मदत करा ... सहकार्य करा.. सर्व पोलिसांना व त्यांच्या कार्याला  माझा मनापासून सलाम.. आपलाच  पोलिस मित्र. तुमच्याही भावना कॉमेंट करा  शेअर करा..

यशाचे रहस्य.. Key to success

इमेज
नमस्कार मित्रांनो सध्या कोरोना मुळे खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक भावना तयार होत आहेत. तसेच परीक्षा होणार की नाही यामुळेसुद्धा विद्यार्थि निराशेत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून खास विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी  सकारात्मक विचारांसाठी एक तासाची मोफत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे . यशाचे रहस्य या कार्यशाळेत पुढील बाबी असतील 1.अभ्यास करताना एकाग्रता कशी वाढवावी ? 2.टेन्शन व ताणतणाव कमी करून आनंदी कस राहायचं ? 3. आपले करिअर व आपले ध्येय कसे गाठायचे ? ४. नाते कसे सांभाळायचे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यातून मिळतील. तरी खालील लिंक वर जाऊन आजच रजिस्ट्रेशन करा . स्वतः चे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सज्ज व्हा. अधिक माहितीसाठी  संपर्क:- नागेश विढोळे : ७७६७९०१६७७          हर्षिता : ९८२३७९५१७१ यशाचे रहस्य कार्यशाळा दि. २७ जून , शनिवार वेळ :- सकाळी १० ते ११  भाषा :- मराठी, हिंदी, इंग्रजी मोफत. ऑनलाईन Zoom link . 👆Click here Hello friends  Currently, corona causes a lot of negative thoughts.  The students are also frustrated a...