मैत्री..
मित्र, सखा, सवंगडी,दोस्त , सोबती असे कितीतरी नावाने ज्याला आपण संबोधतो ती म्हणजे मैत्री.आपण आपल्या आईवडीलांपेक्षाहीजास्त वेळ आपल्या मित्रांसोबत घालवत असतो.आपले जीवनाच्या जडण घडणीत सर्वात जास्त वाटा आपल्या मित्रांचा राहत असेल, असे मला वाटत..
कोण असतो मित्र ?
मित्र असा व्यक्ती की ज्या गोष्टी आपल्याबद्दल आपल्या घरच्यांनाही माहिती नसतात त्या आपल्या मित्रांना माहिती असतात. आपल्याला हवं ते बोलण्याचा स्वतंत्र आपल्या मित्राजवळ असत.प्रत्येक क्षणी नेहमी आपल्या अडीअडचणी,सुखात, दुःखात आपल्या सोबत राहतो तो आपला मित्र. मित्राची अशी कुठलीही ठराविक व्याख्या मला तरी करता येणार नाही.कारण या मैत्रीचे अनुभव सगळ्यांना वेगवेगळे असणार.
आपल्या आईवडीलांपासून शिक्षणाच्या ,नोकरीच्या निमित्ताने दूर असताना सर्वात जास्त आपली काळजी घेणारा आपला मित्रच असतो.
मित्रच आपल्याला कित्येक चांगल्या गोष्टी शिकवतो . मनमुराद पणे त्याच्यासोबत आपण वागू शकतो
मला माझ्या मित्रांनी खूप मदत केलीय. जेव्हा मी खचून जायचे, निराश व्हायचो तेव्हा माझे मित्रच मला खंबीरपणे साथ द्यायचे .मी दहावी झाल्यानंतर शिक्षणासाठी आईवडिलांपासून दूर गेलो . त्यामुळे मला माझ्या मित्रांचं सहकार्य खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. मला कुठल्याही बाहेरच्या गोष्टींची माहिती नव्हती, कोणाशी कस बोलावं हे सुद्धा मला माझ्या मित्रांनी शिकवलं. मी हॉस्टेलला असताना नेहमी मला जे पाहिजे ते माझे मित्र मला पुरवायचे. कधी आजारी पडलो तर सख्ख्या भावाप्रमाणे काळजी घ्यायचे. आमची आर्थिक स्थिती साधारण आहे . त्यामुळे कधी मेस च्या पैशांची अडचण यायची तेव्हा माझे मित्र मला न सांगता माझे मेस चे पैसे भरायचे. मित्र असा व्यक्ती आहे की ज्याला आपण ना काही बोलता ही मनात काय आहे , आपल्या अडचणी कळायच्या . मला जेव्हा कधी मदत लागली तेव्हा ठामपणे माझ्यासाठी उभे राहायचे.
मला मी घरच्यापासून दूर आहे अस कधीच जणू दिलं नाही. मला खूप साऱ्या नवीन गोष्टीची माहिती मित्रांमुळेच झाली. खरी दूनियादारी काय ती मित्रांनीच समजावली .जे कुठ्यालच शाळेत जावून शिकायला मिळत नाही ते मित्रांनी शिकवलं. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांचं असणं खूप गरजेचे आहे . नाहीतर जगणं खुप कठीण आहे. आपल्यासाठी नेहमी उभ असणारा आपला हक्काचा माणूस म्हणजे आपला मित्र...
अशा माझ्या सर्व मित्रांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना..
Khup सुंदर
उत्तर द्याहटवा