आवाजबंदी की अजानबंदी ?
राज ठाकरे यांची सभा झाल्यापासून भोंगे हा विषय खूप चर्चेचा झालाय आणि तशी चर्चा होण्यासाठीच हा मुद्दा पुढे आणण्यात आलाय .पण तस बघायला गेल्यास भोंगे हा विषय आपल्यासाठी नवीन नाही . कारण वेळोवेळी सर्वोच्च नायालयाने दिलेल्या निकालानुसार सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा किती असावी यावर आपले मत मांडले आहे.
भोंगे हे फक्त मशिदींवर नसून सर्व धार्मिक स्थळांवर आहे. सर्वच जण त्याचा विनापरवानगी वापर करतात. कायदा हा सर्वांसाठी सारखा असावा अस आपल्याला वाटत आणि ते योग्यही आहे. पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा आपल्या भावना दुखायला लागतात. मग अशा वेळी आपण कायद्याला किंवा आपल्यामुळे इतर लोकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या भोंग्याचा आवाज हा विशिष्ट धर्माच्याच लोकांना एकु जात नसून लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना तो ऐकू जात असतो.
जेव्हा एखादा लहान मूल झोपलेले असते आणि अचानक भुकंपासारखा त्याला आवाज येऊन ते झोपेतून जाग होते तेव्हा त्याला शांत करायची कसरत त्याच्या आईलाच करावी लागते. बिचारा नुकताच झोपलेला असतो. तसच वृद्धांना सुद्धा शांततेत काम करण्याची सवय असते अशा दररोज अनावश्यक होणाऱ्या आवाजने त्यांनाही त्रास होतोच.
शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सगळ्यांनाच या आवाजाचा त्रास होतोच . पण हा धार्मीक विषय असल्याने भावणांचा विचार करून यावर कोणी जास्त भाष्य करत नाही आणि त्यामुळे ही आवाजाची शर्यत दिवसेंदिवस वाढतच गेली आणि अजूनही सुरूच आहे.
म्हणुन यावर योग्य वेळी योग्य विचार होऊन सर्व धर्मांसाठी सारखे नियम लावून त्याचे पालन करून घेतल्यास कोनाच्याही भावनांना ठेच न लागता मार्ग काढता येईल.
त्यामुळे याकडे फक्त अजानबंदी म्हणुन न बघता आवाजबंदी या स्वरूपात बघीतल्यास निर्णय घेण्यास सोप जाईल.
बाकी आपलं काही यावर मत असल्यास नक्की कॉमेंट करा.
लेख आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करा
धन्यवाद..

तुम्ही जे विचार तुमच्याशब्दात मांडता खरच खूप छान आहे प्रत्येक लेखानुसार शब्द मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या लेखच शीर्षक एवढं आकर्षक असत की त्यामुळे श्रोता लेखामध्ये एवढ काय दडलेलं आहे हे वाचण्यासाठी उत्सुकत असतो.😊
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाTumhi khup utkrushta paddhatine tumacha lekh sadar karata ..keep it up always I am proud of you 👏 👏👏
उत्तर द्याहटवाKhup chhan lihila ahe. shabdanchi yogya mandani keli ahe. Topic pn daily life routine sobt jodta ahe.kharach topic uttam nivdla.ani yvr kharokharch bolne garjeche ahe.
उत्तर द्याहटवाKhup chhan lihilay,mojkya shabdat Ani muddesud
उत्तर द्याहटवा