आपले पर्यावरण आपली जबाबदारी..
पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या सभोवतालचा परीसर. आपल्या जिवनात पर्यावरणाला खूप महत्व आहे. पर्यावरण आहे त्यामूळे आपण आहोत. मानवाची उत्पत्ती पर्यावरणामुळेच झाली.
पर्यावरणात उपलब्ध असलेले सर्व घटक जसे हवा, पाणी, जमीन ,झाडे या सर्वांची हानी सध्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहे .
मानवाचा जसजसा प्रगती झाली तसतशी पर्यावरणाची नुकसान होत गेले आणि अजूनही होत आहे. जसे की रस्त्यांसाठी डोंगर पोखरने, घरांसाठी झाडे तोडणे, दूषित पाणी नदीत सोडणे , मोबाईल टॉवर मुळे पक्ष्यांची संख्या कमी होणे असे बरेच काही सध्या होत आहे आणि यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे यावर लवकर पाउले उचलून प्रयावरणाच्या रक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आपण वैयक्तीक पणे काय करू शकतो याचा उहापोह मी याठिकाणी करतो.
पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करणे. यांमध्ये प्लास्टिक वापर कमी करणे.यासाठी आपण कपड्याच्या पिशव्या वापरू शकतो. पिण्याची पाण्याची बाटली सोबत ठेवणे जेणेकरून प्रत्येकवेळी पिण्यासाठी प्लास्टिक ची पाण्याची बाटली विकत घ्यावी लागणार नाही.
प्रदूषण कमी करण्यासाठी शक्य तेथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे. यांमध्ये एसटी, शहरी बस सेवा यांचा वापर करता येईल. जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकल वापरणे.
कचरा वर्गीकरण करणे जेणेकरून त्याचा उपयोग पुन्हा करता येईल. शक्य असेल तेवढ्या प्रमाणात झाडे लावणे आणि टिकवून ठेवणे, त्यांची निघा राखणे.
अशा काही गोष्टी एकत्रित पणे केल्यास प्रदूषण पूर्णपणे कमी होणार नाही पण प्रदूषण वाढीचा वेग नक्कीच कमी होईल आणि एकदिवस प्रदूषणात घट होईल.
त्यामुळे आपले पर्यावरण ही आपली जबाबदारी मानून त्यासाठी आवश्यक ते सर्व करणे.
(आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करा. काही सूचना असल्यास नक्की कळवा )

Khup sundar
उत्तर द्याहटवाSure ,we need to take care of environment,very well penned,keep it up👍
उत्तर द्याहटवाKhup chhan👍
उत्तर द्याहटवा