Lockdown..आणि शेतकरी
Lockdown च्या काळात सर्वात जास्त दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे शेतकरी.
कोरोणाच्या काळात सुध्दा आपल्याला ज्याने अन्न पुरवलं असा सर्व जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी.
आपल्याला माहीत आहे Lockdown च्या काळात कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील टरबूज,कांदे, द्राक्ष, टमाटे , बाजार बंद असल्याने फेकून दिले.ज्या बागांना आपल्या लेकराप्रमाणे जपलं त्याच बागा तोडण भाग पडलं.
आपण सर्वजण घरात नवनवीन पदार्थ खात होतो.पण याच बळीराजाला मार्केट बंद असल्याने काहीच खरेदी करता येत नव्हतं. स्वतः पिकवलेले अन्न सोडून दुसरं काहीच तो खरेदी करू शकत नव्हता .
संसार हा फक्त भाजीपाल्यावर चालत नसून मीठ , चटणी, तेल हे पण लागतं.ते विकत घेण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.
आपण खरेदी करत असलेल्या किराणा मालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. पण कांद्याचे भाव मात्र अत्यंत कमी.तसेच खाद्य तेल ज्यापासून बनते , त्या सोयाबीन चे भाव ३५₹ रुपये किलो पण खाद्य तेल मात्र १०० रुपये. त्याचप्रमाणे शेंगदाणे १२० रुपये किलो , पण भुईमुग मात्र ४० रुपये किलो.
किती ही तफावत?
अशा परिस्थितीतही या बळीराजाने आपले कर्तव्य प्रामाणीकपणे पार पाडले. त्याने आपल्या शेतातील टरबूज, द्राक्ष,कांदे गरजूंना फुकट वाटले. पण कधीच जाहिरात केली नाही. आणि आपण कोण्या एका वाढदिवसाच्या दिवशी कोणालातरी केक खाऊ घालतो आणि सगळ्या सोशल मीडिया वर आपले फोटो टाकतो.
या सर्व अडचणीत सुद्धा तो आपल्या शेतकरी आईबापासाठी, लेकरांसाठी, गाई - म्हशी वासरांसाठी पुन्हा एका नव्या उमेदीने उभा राहतो आणि कामाला लागतो.
त्याला हवी आहे फक्त साथ .
आपल्या आपुलकीच्या माणसांची.
आपण नक्कीच या शेतकऱ्याला, बळीराजाला साथ द्याल...
आपलाच शेतकरीपुत्र
धन्यवाद!
आपल्या काही भावना असतील तर नक्कीच comment करा.*आवडल्यास* आपल्या मित्रांना पाठवा.
Thank you...

👌👍👍
उत्तर द्याहटवाUr doing very well ...keep it up👌👍
उत्तर द्याहटवाअति उत्तम कविता आहे कोणी केली माहिती नाही पण ज्याने सुद्धा केली त्याला माझा सलाम. खरच आपण कोठेतरी चुकतो का असा मानवाला प्रश्न पडायला हवा की आपण शेतकऱ्यांना किती इज्जत देतो तर त्याने जरशेती करणे सोडली तर आपण काय खाणार याचा विचार केला का...? शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर शेतकऱ्याचा मान समान करायला शिका
उत्तर द्याहटवा