विद्यार्थी आणि परीक्षा
image source: www.irishtimes.com
Lockdown मुळे १५ मार्च पासून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, विद्यापीठे इ. सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात Lockdown मुळे सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या. आणि आता तेच परीक्षा घेण्याचे नियोजन करणं सर्वांसाठी अवघड होत आहे.
विद्यार्थी कधीच परीक्षा द्यायला घाबरत नाही . एका रात्रीत अभ्यास करून चांगले मार्क्स घेऊन पास होणारे खूप सारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत.
सध्या सरकारी निर्णयाच अस झालंय की, ज्याच्या भल्यासाठी तुम्ही जो निर्णय घेताय ते विद्यार्थी सोडून बाकी सगळ्यांना विचारणे चालू आहे की परीक्षा घ्यायच्या कि नाही .
त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की, किमान एकदा
तरी या विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे, याचीही विचारणा व्हावी.
एक दिवस सांगणार परीक्षा घ्यायच्या मग आम्ही पुस्तक, नोट्स जमा करायला लागायच आणि लगेच दुसऱ्या दिवशी परीक्षा होणार नाही असा निर्णय .मग असले नसलेले सर्व पुस्तकं पुन्हा ठेवा, नंतर पुन्हा काही दिवसांत नवीन निर्णय की परीक्षा होणार.
आम्हा विद्यार्थ्यांना परीक्षेची कसलीही घाई नाही. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी, तुम्ही म्हणाल त्या वेळी आम्ही परीक्षा द्यायला तयार आहोत.त्यामुळे शांततेत निर्णय घ्यावा.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा आहे.
फक्त परीक्षा घ्यायच्या असल्यास , अभ्यासाची पुस्तकं, नोट्स आम्ही आमच्या हॉस्टेल वर, रूम वर सोडून आलोय. त्याची जर व्यवस्था झाली तर आम्हाला परीक्षा द्यायला कुठलीही अडचण नाही.
राहिला कोरोनाचा प्रश्न, आम्ही कोरोणा ही समस्या मानतच नाही, आम्ही आमच्या सुरु असलेल्या आयुष्यात कोरोनासोबत जगण्याची सवय आधीच करून घेतलीये.
तुम्ही आम्हाला अभ्यासाचं काम लावून खूप चांगली गोष्ट करताय की आम्हाला कामाला लावताय. तसही Facebook, instagram, youtube बघून आम्ही खूप कंटाळलोय.
त्यामुळे आपणास जे योग्य वाटेल ते करावं फक्त जे एकदा सांगाल त्यावरच कायम रहाव.
धन्यवाद...
तुमच्या परिक्षेविषयीच्या भावना comment करा आणि मित्रांना share करा.
*धन्यवाद!! आणि All The Best 👍
😊😊



Sahi hai bhava
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर.. विद्यार्थ्यांच्या भावना जपन हे महत्त्वाचं...
उत्तर द्याहटवा💥chhan 💥
उत्तर द्याहटवाSuper bbbbb...... acutely students la vicharl pahije ki exam ghyaychi ki nhi.....ani ho students exam la bhit nahit o......
उत्तर द्याहटवाहा निर्णय अति उत्तम असल्याचे वाटते कारण जर परीक्षा होत असतील तर विद्यार्थी नक्कीच अभ्यासला लागेल पण निर्णय ठाम असतील तर.निर्णय बदलून विदयार्थ्यांचं आत्मविश्वास कमी होऊ शकतो व तसेच काही विध्यार्थी म्हणजेच फायनल इयर यांच्या साठी परीक्षा लागू करण्यात आल्या या कारना मुळे मतभेद निर्माण होतात त्यांनीच काय पाप केल...?त्यामुळे सरकारने योग्य च निर्णय घ्यावा आणि तसेच परीक्षा घेत असताना सुरक्षित अंतर व सर्व सेनेटाइझर चा वापर केला पाहिजे.
उत्तर द्याहटवाVery Nice 👍
उत्तर द्याहटवाKharay nagesh sir
उत्तर द्याहटवामाझ्या मते परिक्षा घेण्यासाठी सद्यस्थिती अनुकूल नसली तरी परिक्षा ह्या रद्द व्हायला नकोच भलेही त्या सगळी परिस्थिती सुस्थितीत आल्यानंतर ही घेतल्या तरी चालतील. 10 12 वि पर्यत ठीक आहे परिक्षा रद्द झाल्या पण पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नुसते पदवीधर तयार करणं हे देशहिताच नाहीये अस मला वाटत आणि तू म्हटल्याप्रमाणे नागेश विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना सामावून घेतलं पाहिजे त्यांच्या भावना कुठे तरी समजून घेतल्या पाहिजे तू हा प्लॅटफॉर्म तयार केलास तुझे मानावे तेव्हडे आभार कमी पडतील.....
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाNice Dada
उत्तर द्याहटवा💥💥💥💥chhan💥💥💥
उत्तर द्याहटवाOutstanding
उत्तर द्याहटवा