कोरोना ,शिक्षण, विद्यार्थी...उद्याच भविष्य?

 कोरोना आल्यापासून सर्वात जास्त नुकसान कोणाचं होत असेल तर ते म्हणजे शिक्षणाचं.

आर्थिक नुकसान तरी भरून काढता येईल पण शैक्षणिक नुकसान भरून निघणे जास्त अवघड आहे.

नुकत्याच कशातरी शाळा सुरू झाल्या होत्या पण पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती म्हणून पुन्हा सरसकट सर्व शाळा बंद करण्यात आल्या. आपल्या सर्वांनाच याचा अनुभव आला आहे की शाळेतील शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यात किती फरक आहे. शेवटी शाळेतल्या शिक्षणाची गुणवत्ता ऑनलाईन शिक्षनाला येणे नाहीच .

त्यामुळे माझ्या मते सरकारने शाळा बंद करण्याआधी योग्य विचार करणे पालकांचं तसेच विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं मत विचारात घ्यायला पाहिजे. असे केल्यानंतर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती बघून निर्णय घ्यायला पाहिजे. सरसकट सर्वच शाळा बंद करणं हे काही प्रमाणात मला तरी चुकीचं वाटत. कारण बऱ्याच गावाकडच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोरोनाचे नियम पाळून शाळा होऊ शकतात. 

ज्या प्रमाणे सरकार निवडणुकांसाठी नियमावली तयार करते पण निवडणूक घेतेच. त्याचप्रमाणे शाळा, कॉलेजचं सुद्धा नियम बनवावे आणि शाळा ,कॉलेज सुरू ठेवावे असे मला वाटते.

ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाची गुणवत्ता खूप मोठ्या प्रमाणात ढासळत आहे. डिग्री फक्त मिळते पण हवं तसं ज्ञान किंवा कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होताना दिसत नाही. त्यामुळे डिग्री ही फक्त कागद म्हणून राहते. त्यामुळे सारासार विचार करता आताचेविद्यार्थीहेच उद्याचे देशाचे भविष्य आहे. म्हणुन आपलं भविष्य आपल्याला सुरक्षित करायचंअसेल तर सरकारने शिक्षणाच्या बाबतीत सर्वांचे विचार विचारात घेऊन निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती

विचार बदला.. आयुष्य बदलेल.. ( Change Your Mind .. Change Your Life ..)

Lockdown .. आणि लहाण मुले