आपले आरोग्य, आपल्या हाती

माणसाचे आरोग्य हे दोन प्रकारचे आहे. पहिले शारीरिक आणि दुसरे मानसीक.


शारीरिक आरोग्यविषयक बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे आणि त्याची काळजी प्रत्येक जण घेत असतो. परंतु मानसीक आरोग्याविषयी अजूनही तेवढी चर्चा आपल्यामध्ये होताना दिसत नाही. यामुळे आपल्याला मानसीक आरोग्यावर जास्त लक्ष्य देणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीनाकाही समस्या आल्या आहेत. याचमुळे काही प्रमाणात मानसीक आरोग्यावर सुद्धा परिणाम झालेला दिसतो

मागील काही दिवसात आलेल्या बातमी नुसार यावर्षी झालेल्या वक्तींच्या आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामागे काही महत्वाची कारणे म्हणजे नोकरीची अस्थिरता, अर्थिक ताणतणाव, परिवारातील समस्या ई. होती.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी असा अडचणीचा टप्पा येतो की आपल्याला मरणे हे जगण्यापेक्षा सोपे वाटते. मग अशा वेळी व्यक्ती आत्महत्येचा विचार करतो. पण आत्महत्या हा काही या गोष्टीवर उपाय नसतो.

म्हणुन आपले मानसीक आरोग्य निरोगी राण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयीचा विचार आपण याठिकाणी करू.

१. संवाद: संवाद हा आपल्या जिवनात खूप महत्वाचा आहे. आपल्याला येत असलेल्या समस्यांमुळे आपल्या डोक्यात खूप सारे नकारात्मक विचार येतात. हे विचार आपण कोणाशी बोललो तर आपल्याला येत असलेल्या समस्यांवर उपाय निघतात आणि आपल्या डोक्यातील नकारात्मक विचार नाहीसे होतात. त्यामूळे संवाद करणे खूप आवश्यक आहे.

२.योग/ध्यान : दिवसभरातील चांगले वाईट विचार आपल्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी योग करणे किंवा द्यान केले पाहिजे . रोज सकळी आणि संध्याकाळी १० मिनिटे ध्यान केल्यास आपल्याला शांतता भेटते आणि आपले नकारात्मक विचार नाहीसे होतात.

३. कामाचे योग्य नियोजन : बऱ्याचदा आपल्याला आपला कामामुळे मोठ्या प्रमाणात मानसीक ताण येतो आणि त्याचे परिणाम म्हणुन आपल्या घरातील व्यक्तींवर नकळत आपली चिडचिड वाढते आणि त्यातून अजून नविन ताणाची निर्मिती होते. त्यामुळे आपण आपल्या कामाचे योग्य नियोजन केल्यास यात सुधारणा होऊ शकते. आणि घरी घरच्या व्यक्तींशी आपल्या कामाची चर्चा न केल्यास घरातील व्यक्तीही आनंदी राहतील.

४. आर्थिक नियोजन : हा मानसीक आरोग्य साठी सर्वात महत्त्वाचा घटक . यासाठी पैशाचे योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. खर्च तेवढाच करावा जेवढं आपले उत्पन्न आहे. उगाच कर्ज काढून मोजमजा करण्यात कुठलाही मोठेपणा नाही. त्यामुळे आपलं उत्पन्न, खर्च,बचत हे योग्य प्रमाणत असल्यास यामुळे मानसीक ताण निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.

५. आवडी/छंद जोपासा:- प्रत्येकाला काही छंद असतात काही आवडी असतात. आपल्या कामामुळे आपण त्याकडे दर्लक्ष करत असतो. असे न करता सुट्टीच्या दिवशी जेव्हां वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. याने काही काळ का होहीना आपला ताण आपण विसरतो. रोजची कामे करण्यासाठी नाविन ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे आपल्या आवडी आपण जोपासल्या पाहिजे.

 या व्यतिरिक्त सुद्धा आपण अजून काही करू शकतो जसे शक्य असल्यास परिवारासोबत कुठे तरी बाहेर फिरायला जाणे, मित्रांना जाऊन भेटणे, सिनेमा, नाटके बघणे, पुस्तके वाचणे, कॉमेडी सीरिअल्स बघणे. अशा काही गोष्टींमुळे आपण आपले मानसिक आरोय नकीच सुधारू शकतो.

आपल्याकडे सुद्धा काही उपाय किंवा सूचना असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा.

लेख आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करा.

धन्यवाद!!!

टिप्पण्या

  1. खूप सुंदर लेख आहे...👍
    आजच्या जीवनात मोबाईल चा वापर खूप असल्यामुळे थोड्या प्रमाणात त्याचा देखील परिणाम दिसतो चिडचिड होण्याची ते एक कारण असू शकतो, त्यामुळे शक्य असल्यास लहान मुलं त्यांच्या सोबत आपल्या वेळ घालवावा. मन आणि डोक दोन्ही आनंदी राहतात.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Lockdown .. आणि लहाण मुले

विद्यार्थी आणि परीक्षा

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती