आयुष्यावर बोलू काही..

सुबह होती हैं। शाम होती हैं। 

जिंदगी यूं ही ,तमाम होती हैं।

या हिंदीतील ओळी आपल्याला बरच काही सांगून जातात.

प्रत्येकाचा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. 

माझ्या मते आपल्या जीवनाला एक धेय्य असावं की आपल्याला आपल्या जिवनात काय करायचं , आपन कशासाठी जगायचय याचं कारण आपल्या प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो नाहीतर वरच्या ओळीप्रेमाने आपलं आयुष्य होईल.

आपल्याला आपला जिवन जगायच म्हणुन जगतो असं वाटायला नको. कारण ध्येय असल्यावर ते पूर्ण करण्यासाठी माणूस प्रत्येकवेळी काहीना काही नवीन शिकत राहतो, ध्येय प्राप्त करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या मिळवण्याचं काम करतो. या सर्व झटपटित जीवन एक आकार घ्यायला लागेल.

त्यामुळे प्रत्येकाचा आयुष्यात ध्येय असणे गरजेचे आहे.

जसे समजा आपल्याला एखाद्या गावी जायचं आहे.तर त्या गावी जाण्यासाठी काय काय करणे गरजेचे आहे ते आपण करतो. जसे सामानाची निवड करणे, रस्त्याची माहिती करणे, बसची महिती करून घेणे आणि त्या गावी आपल्याला काय कामासाठी जायचं आहे. याची जशी आपण तयारी करतो तशीच तयारी आपल्याला आपल्या जीवनात धेय्य ठरवल्यानंर करावी लागते .

त्यामुळेच आपल्या जीवनात आपल्याला नवनवीन अनुभव येतात आणि या अनुभवातून अजुन आपलं जीवन कसं चागलं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो.

त्यामूळे आपल्या जीवनात धेय्य असणे खूप गरजेचे आहे असे मला वाटते .

बाकी आपल्याला काय वाटंत ? मी मांडलेल्या मताविषयी आपलं काही मत असेल तर नक्की सांगा.


आपल्या अभिप्राय आणि 

मतांच स्वागत आहे.. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Lockdown .. आणि लहाण मुले

विद्यार्थी आणि परीक्षा

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती